अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्या दोघांचे अनेक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या दोघांची लव्ह स्टोरी तर सगळ्यांना माहितच आहे. मात्र, रितेशचं पहिलं प्रेम हे जेनेलिया नाही याची माहिती अनेकांना नाही.
रितेशने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या पहिल्या प्रेमा विषयी सांगितले आहे. यात त्याने जेनेलिया आणि त्याच्या पहिल्या भेटी विषयी सांगितले. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशशी बोलत नव्हती. रितेशचे वडील हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे तो स्वत: हून बोलणार नाही, तर मी का बोलाव असं तिला झालं. त्यासोबत तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे हा विचार करून ती त्याच्याशी बोलण्यात काचकूच करत होती.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘या’ घटनेनंतर तुटली बाळासाहेब आणि दिलीप कुमार यांची मैत्री
त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा ते बोलले तेव्हा जेनेलियाने त्याला प्रश्न विचारला की, तुझ्यासोबत तुझे सुरक्षारक्षक का नाहीत? त्यानंतर ते हळूहळू बोलू लागले. त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. आता या दोघांना पाहिल्यावर हे एकमेकांसाठी बनले आहेत असे वाटते.
आणखी वाचा : ..मग मुस्लीम व्यक्तीशी लग्न करतानाच असं का?; आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाचा सवाल
मात्र, जेनेलिया रितेशचं पहिलं प्रेम नाही हे स्वत: रितेशने एका मुलाखतीत सांगितले आहे. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर रितेशला आपल्या पहिल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा त्याचे प्रेम मिळवून दिले आहे. जेनेलियाने त्याला फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला नाही तर चक्क तिने त्याला एक कॅमेरा भेट दिला आणि आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.