निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या ‘स्टार प्लस’वर ‘लिप सिंग बॅटल’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करतेय. या शोमध्ये बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. नुकतीच या आगळ्या-वेगळ्या रिअॅलिटी शोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या खास अंदाजात झिंगाट डान्स करून खूप धमाल उडवली आणि शो अधिकच मनोरंजक झाला.

वाचा : लंडनमध्ये हातात हात घालून फिरताहेत डिंपल कपाडिया- सनी देओल

शोमधील सूत्रांनुसार, झिंगाट गाण्यावर डान्स केल्यावर रितेश देशमुखने लिप सिंग बॅटलचं चॅलेंज घेत, मिथुन चक्रवर्तींच्या ‘जीते हम शान से’ चित्रपटातल्या ‘जुली जुली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला. मिथुनदाच्या गेटअपमध्ये आणि त्यांच्या स्टाइलमध्ये परफॉर्म करून रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली.

वाचा : दिव्या भारतीच्या बहिणीचे हे फोटो पाहिलेत का?

एवढंच नाही, तर शिल्पा शेट्टीनेही लिप सिंग बॅटलचे चॅलेंज घेत, अमिताभ बच्चन यांचा गेटअप केला. आणि बिग बींच्या ‘हम’ चित्रपटातील लोकप्रिय ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्यावर परफॉर्म केले. शिल्पा शेट्टी महानायक अमिताभ बच्चन स्टाइलमध्ये डान्स करत असतानाच फराह खान ही किमी काटकर झाली होती. दोघींनी मिळून ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर परफॉर्म करून धमाल उडवून दिली.