बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रितेश त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच रितेशने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि त्याची दोन्ही मुलं दिसतं आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला एक गाडी जोरात येते आणि दुसऱ्या गाडीला जोरात धडक देते. त्यानंतर रितेशची दोन्ही मुलं बोलतात बाबा आई आली…आणि रितेश त्यावेळी रुबिक्स क्युब खेळत असतो. त्याची मुलं त्याचा जवळ जाऊन बोलतात तिने तुझ्या गाडीला धडक मारली आहे असं म्हटल्यानंतर रितेशचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत. हा व्हि़डीओ शेअर करत ‘बाबा आई आली !!!!’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे. त्याचा हा विनोदी व्हिडीओ पाहून त्याच्यावर सेलिब्रिटींपासून चाहत्यांनी ही कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

रितेश गेल्या वर्षी टायगर आणि श्रद्धा कपूरच्या ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसला. सध्या रितेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ट्रिलॉजीवर काम करत असल्याचे म्हटले जातं आहे. एवढंच नाही तर लवकरच आपल्याला रितेशला एका हॉरर-कॉमेडी पटात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याचे म्हटले जात आहे.