गणपती बाप्पा कधी येणार याची आतुरता सगळ्या भक्तांना लागली असते. आज गणेश चतुर्थी आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करते. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलियाचे कौतुक केले आहे.

दरवर्षी रितेशच्या घरी गणपती बाप्पाचे आगमण होते, त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही रितेशने गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. रितेशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दिसत आहेत. हे दोघं गणपती बाप्पाची आरती बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. रियान आणि राहिल दोघांनीही एकसारखे कपडे परिधान केले आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पजामा आणि त्यावर गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या वैवाहिक जीवनात मोठी समस्या आलीये’; KBC 13 होस्ट करताना अमिताभ यांचं वक्तव्य

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा : ‘बेटा’ चित्रपटामुळे बोनी कपूर आणि श्रीदेवीचं झालं होतं मोठं भांडण

riteish deshmukh, riyan and rahil,
नेटकऱ्यांनी रितेशच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्याची आणि जिनेलियाचे कौतुक केले आहे.

रितेशने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ३ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. रियान आणि राहिलचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत ते रियान, राहिल आणि रितेशची स्तुती करत आहेत. ‘खूप चांगली गोष्ट आहे, मुलांना आपल्या धर्माविषयी माहित असायला पाहिजे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्वा तुम्ही दोघांनी मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत, देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहो’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलीयाची स्तुती केली आहे.

 

Story img Loader