बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिने प्रियकर शिवम तिवारी याच्याशी बुधवारी विवाह केला. या महिन्याअखेर पर्यंत रिया विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा होत्या. अखरे तिने काल खासगी विवाहसोहळ्यात लग्न केल्याचे वृत्त आता समोर आलेय. कोणताही गाजावाजा न करता तसेच प्रसारमाध्यमांनाही याची खबर लागू न देता तिने गुपचूप विवाह केला आहे.

वाचा : हातात एकही चित्रपट नसताना करिष्मा कमवते कोट्यवधी रुपये!

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया आणि शिवमने पुण्यात लग्न केले असून, या विवाहसोळ्याला त्यांचे कुटुंबिय आणि जवळची काही मित्रमंडळी उपस्थित होती. लग्नापूर्वीच रिया गरोदर असल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत असून, याच कारणामुळे तिने अचानक लग्न केल्याचे म्हटले जातेय. ‘इंडिया टुडे’ आणि इतर काही वेबसाइट्सनेही यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

वाचा : श्रीदेवीच्या बर्थडेसाठी ऐश्वर्या, राणी आल्या एकत्र

गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र, अद्याप यांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत. एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २.२’ या वेबसीरिजमुळेही रिया चर्चेत आली होती. ‘रागिनी एमएमएस २’च्या चित्रीकरणादरम्यान तिने आपल्या सहकलाकार अभिनेत्याची पॅन्ट काढल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. निर्मात्यांनी दृश्याच्या गरजेपेक्षा अधिक बोल्ड होण्यास सांगितल्यामुळेच तिने हे कृत्य केले होते. एकेकाळी बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या रियाने ‘स्टाईल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.