‘रॉकी’ आणि ‘रॅम्बो’ या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळले आहेत. १९८० च्या सुमारास लास वेगास येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना स्टॅलोन यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यावेळी ती महिला १६ वर्षांची होती.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

या आरोपांनंतर मिशेल बेगा या प्रवक्त्यांच्या माध्यमातून स्टेलॉन यांनी आपली भूमिका सर्वांसमोर स्पष्ट केली. ‘हे खूपच हास्यास्पद आहे. मुळात ती जे काही सांगतेय त्यात काहीच तथ्य नाहीये. ती जे काही सांगतेय त्याच्याविषयी आम्हाला कोणालाही काहीच माहिती नव्हती. आज माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्वत: स्टॅलोन यांना या आरोपांबद्दल कळाले. मात्र, स्टॅलोन कधीच या महिलेला भेटले नव्हते, असे त्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

महिलेच्या दाव्यानुसार ती स्टॅलोन यांना हिल्टन हॉटेलमध्ये भेटली होती. त्यावेळी स्टॅलोन आपल्या मित्रांसोबत या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार स्टॅलोन आणि त्यांच्या अंगरक्षकाने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले होते. ‘स्टॅलोन यांनी त्यांच्या अंगरक्षकालाही माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बोलावले. त्यावेळी मला फार संकोचल्यासारखे वाटत होते. पण, माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता’, असे संबंधित महिलेने सांगितले. या प्रकाराची कुठेच वाच्यता न करण्यासाठी स्टॅलोन यांनी आपल्याला धमकावले होते, असाही दावा महिलेने केला.