दहा वर्षांहून अधिक काळ सहाय्यक दिग्दर्शक आणि स्टंट कोऑर्डिनेर म्हणून काम केल्यानंतर रोहित शेट्टीने २००३ मध्ये ‘जमीन’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर त्याने ‘गोलमाल- फन अनलिमिटेड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि तिथून त्याच्या करिअरला वेगळंच वळण मिळालं. हा कॉमेडी चित्रपट केवळ सुपरहिट ठरला नाही तर समीक्षकांकडूनही त्याची प्रशंसा झाली.

गेल्या १३ वर्षांमध्ये रोहित शेट्टीने १३ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आणि त्यापैकी ११ चित्रपट हिट ठरले. अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा मिळून एकंदरीत पैसा वसूल मसालापट चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊयात..

– रोहितने दिग्दर्शन केलेल्या १३ चित्रपटांपैकी ११ चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरले.
– १३ पैकी ४ चित्रपट (गोलमाल ३, चेन्नई एक्सप्रेस, गोलमाल अगेन आणि सिम्बा) ब्लॉकबस्टर ठरले.
– २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट त्यावेळी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. इतकंच नव्हे तर शाहरुखच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाईचा चित्रपट आहे.
– रोहितच्या सलग आठ चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईचा १०० कोटींचा आकडा पार केला आहे. अशा स्वरुपाची ‘अष्ट’पैलू कामगिरी करणारा हा बॉलिवूडचा एकमेव दिग्दर्शक आहे.
– रोहितच्या ३ चित्रपटांनी २०० कोटींचा टप्पा गाठला आहे.
– ‘सिम्बा’ हा रोहित शेट्टीचा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.
– ‘गोलमाल’ फ्रँचाइसीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असून ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. अजय देवगणच्या करिअरमधील त्याचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट होता.
– २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटाने भारतात जरी कमी कमाई केली असली तरी भारताबाहेर या चित्रपटाने तुफान कमाई केली.

रोहित शेट्टीचे १०० कोटी क्लबमधील चित्रपट –
२०१० गोलमाल – ३ (१६० कोटी)
२०११ सिंघम (१५० कोटी)
२०१२ बोलबच्चन (१८७ कोटी)
२०१३ चेन्नई एक्सप्रेस (२२६ कोटी)
२०१४ सिंघम रिटर्न्स (२१६ कोटी)
२०१५ दिलवाले (१५० कोटी)
२०१७ गोलमाल अगेन (२०५ कोटी)
२०१८ सिम्बा (२३० कोटी*)