कलाविश्वात लग्नसराईची चर्चा अद्याप सुरू असून आता एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत तृतीयपंथीयाची भूमिका साकारत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रुबिना दिलैक प्रियकर अभिनव शुक्लाशी लग्नगाठ बांधणार आहे. २१ जून रोजी हा विवाहसोहळा पार पडणार असून लग्नपत्रिका रुबिनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टेलिव्हिजन विश्वात आपल्या सौंदर्याने अनेकांनाच घायाळ करणारी आणि नेमीच प्रकाशझोतात असणारी अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. गेले काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर रुबिना आणि तिचा प्रियकर अभिनव शुक्ला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. टेलिव्हिजन विश्वात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही जोडी शिमलामध्ये विवाहबद्ध होणार आहे. तर विवाहपूर्वीचे कार्यक्रम अभिनवच्या गावी लुधियानामध्ये पार पडणार आहेत. इन्स्टाग्रामवर रुबिनाने लग्नपत्रिका शेअर केली असून ही पत्रिका पर्यावरणपूरक असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाचा : ‘रेस ३’मध्ये पुन्हा एकदा सलमान- मिकाची जादू चालणार 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबिना आणि अभिनव यांनी कधीही त्यांचं नातं सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर या दोघांनीही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवली. अभिनवविषयी रुबिनाने नेहमीच आपलं प्रेम खुलेपणाने व्यक्त केलं आहे.