टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकनं प्रियकर अभिनव शुक्लासोबत लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गुरुवारी शिमलामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या मालिकांमुळे रुबिना घराघरात पोहोचली. ‘शक्ती’ या मालिकेत तिनं साकारलेल्या तृतीयपंथीयाच्या भूमिकेनं विशेष प्रसिद्धी मिळवली. तर अभिनव शुक्ला फोटोग्राफर आणि टेलिव्हिजन अभिनेता आहे.

https://www.instagram.com/p/BkSunronDk8/

https://www.instagram.com/p/BkS6cjeHXmG/

पारंपरिक पद्धतीने रुबिना- अभिनवचा विवाहसोहळा पार पडला. टेलिव्हिजन विश्वात आपल्या सौंदर्याने अनेकांनाच घायाळ करणारी रुबिना पांढऱ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. या दोघांची प्रेमकहाणीसुद्धा एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. गणेशोत्सवादरम्यान एका मित्राच्या घरी अभिनवने रुबिनाला पहिल्यांदा पाहिलं आणि पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर एका फोटोशूटनिमित्त या दोघांची पुन्हा भेट झाली. या भेटीचं रुपांतर मैत्री आणि त्यानंतर प्रेमात झालं. २०१५ पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

https://www.instagram.com/p/BkSTU8FHzsu/

https://www.instagram.com/p/BkSkbS4nZQu/

https://www.instagram.com/p/BkSnfr5He3D/

रुबिना आणि अभिनव यांनी कधीही त्यांचं नातं सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न केला नाही. सोशल मीडियावर या दोघांनीही त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवली. अभिनवविषयी रुबिनाने नेहमीच आपलं प्रेम खुलेपणाने व्यक्त केलं आहे. २८ जून रोजी हे नवविवाहित दाम्पत्य त्यांच्या मित्रपरिवाराला एक ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहेत.