बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता अजय देवगण डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे. तो लवकरच ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.
अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या सीरिजमधील लूक शेअर केला आहे. या सीरिजचे चित्रीकरण लवकरच मुंबईमध्ये केले जाणार आहे. मात्र ही सीरिज केव्हा प्रदर्शित होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Happy to announce the crime thriller of the year Hotstar Specials ‘Rudra – The Edge Of Darkness’. This one’s going to be ‘killer’ @DisneyplusHSVIP #DebutDobara #Rudra@ApplauseSocial @BBCStudiosIndia @nairsameer pic.twitter.com/CoFFRlARAW
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 20, 2021
आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केला साखरपुडा
अजय देवगणने ट्विटर अकाऊंटवर सीरिजमधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. “मला तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’ या क्राइम थ्रिलर सीरिजमधून मी डिजिट विश्वात पदार्पण करत आहे” असे अजयने म्हटले आहे.
अजयचा फर्स्टलूक पाहून चाहत्यांमध्ये सीरिजविषयी उत्सुकता पाहायला मिळते. या सीरिजमध्ये अजय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार असल्यामुळे सीरिज कधी प्रदर्शित होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.