राजकुमार राव आणि जान्हवी कपूरच्या ‘रुही’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘स्त्री’ प्रमाणेचं ‘रुही’ हा सिनेमादेखील हॉरर कॉमेड असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर आता या सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. काही तासातचं या गाण्याला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिलीय.
11 मार्चला रुही’ सिनेमा चित्रपटगृहात धडकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता मात्र चांगलीच ताणली गेली आहे. या सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्माची खास विनोदी शैली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘पनघट’ हे ‘रुही’ सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालंय. या गाण्यात राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत जान्हवी कपूरच्या अदा पाहायला मिळत आहेत.
View this post on Instagram
या गाण्यात जान्हवीचे दोन वेगवेगळे लूक पाहायला मिळत आहेत. हॉरर कॉमेडी सिनेमात अभिनय करण्याची जान्हवी कपूरची ही पहिलीच वेळ आहे. तर ‘स्त्री’ या सिनेमातून राजकुमार राव याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
रुही’ सिनेमाच्या पहिल्या गाण्याचा व्हिडीओ राजकुमार राव तसचं जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केलाय. हे गाणं सध्या चांगलंच व्हायरल होतंय. जान्हवी कपूर एक उत्तम डान्सर आहे. सोशल मीडियावर जान्हवी तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.