आमिर खानच्या प्रत्येक चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचे वातावरण पाहायला मिळते. येत्या काही दिवसांमध्ये आमिर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटातून अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा आमिरच्या पत्नीची भूमिका साकारणार होती. पण, आता मात्र चित्रपटाशी निगडीत एक वेगळेच वृत्त समोर आले आहे. आमिर आणि प्रियांकाला रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण, खुद्द आमिरने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे कळते आहे.

एका प्रसिद्ध दैनिकाच्या वृत्तानुसार चित्रपटाच्या टीमसोबत झालेल्या मतभेदांमुळे आमिरने हा प्रोजेक्ट सोडल्याचे म्हटले जाते. तेव्हा आता या वृत्तामुळे आमिरला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याच्या संधीला चाहते मुकणार आहे हेच स्पष्ट होतेय. चित्रपटासंदर्भात अद्यापही कोणती अधिकृत माहिती समोर आली नसल्यामुळे आतातरी कलाकारांनी याविषयी आपले मौन सोडावे अशीच अनेकांची अपेक्षा आहे.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्रा या दोघांनीसुद्धा याविषयी फार काही न बोलण्याचा पवित्रा घेतला. काही दिवसांपूर्वीच एका प्रसिद्ध वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने माध्यमांमध्ये ट्रोलिंग आणि तर्क लावून करण्यात येणाऱ्या बातम्यांवर नाराजी व्यक्त केली. एखाद्या चित्रपटात काम करण्यापूर्वीच त्याविषयी सर्वांना माहिती देणाऱ्यांपैकी मी नाही, असे तिने स्पष्ट केले. प्रियांकाचे हे वक्तव्य आणि राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटातून आमिरचा काढता पाय घेण्याचे वृत्त पाहता चित्रपट वर्तुळातही संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळते आहे.