कलाविश्वात दर दिवशी एक नवी चर्चा कानावर येते. मुख्य म्हणजे या चर्चा कितपत खऱ्या असतात ही अतिशय पुढची बाब. पण, एखाद्या गोष्टीविषयी हलकीशी कुणकुण लागली तरीही अनेकजण त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या बी- टाऊनमध्ये अशीच दोन नावं प्रकाशझोतात आली आहेत. ती नावं म्हणजे ‘यंगिस्तान’ फेम अभिनेता जॅकी भगनानी आणि टेलिव्हिजन अभिनेत्री क्रितीका कामरा यांची.

क्रितीका टेलिव्हिजन विश्वात तिच्या प्रेमप्रकरणामुळेच जास्त चर्चेत होती. पण, त्यानंतर करण आणि तिच्या नात्यात दुरावा आला आणि या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. सध्या ते दोघंही आपापल्या क्षेत्रांमध्ये करिअरला प्राधान्य देत असल्याचंच पाहायला मिळत आहे. पण, यातही त्यांच्या खासगी आयुष्याविषयी सुरु असणाऱ्या चर्चा काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीयेत. सध्याच्या घडीला बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी आणि क्रितीका कामरा यांच्या मैत्रीच्या नात्याची वेगळीच बाजू पाहायला मिळत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

वाचा : स्टिव्ह स्मिथला माफ करा – मायकल क्लार्क

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘पेल्ली चोपुलू’ या तेलुगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी जॅकी आणि क्रितीका एकत्र आले असून, सध्या ते या चित्रीपटाच्या चित्रीकरणावर जास्त लक्ष देत आहेत. पण, चित्रीकरणानंतरही त्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून या आता त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनी जोर धरला आहे. नाईट क्लब, पब, हॉटेल अशा ठिकाणीही त्यांना बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या जोडीवर अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

https://www.instagram.com/p/BgoJq2mHLGc/

https://www.instagram.com/p/Bfdy7xJH1Om/