क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच एका अत्यंत खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाची कोणालाच कानोकान खबर नव्हती. किंबहुना मोजक्याच पाहुण्यांना त्यांच्या इटलीतील विवाहसोहळ्याचे निमंत्रण मिळाले होते. त्यानंतर ‘विरुष्का’च्या लग्नाचे वृत्त आले आणि त्यासंबंधीच्याच चर्चांना उधाण आले. त्यांच्या लग्नाच्या चर्चांचे वादळ शमत नाही तोच अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

वाचा : विराट- अनुष्काचा स्वप्नवत विवाहसोहळा प्लॅन करणारी ‘ती’ व्यक्ती माहितीये का?

दीपिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे दोघंही श्रीलंकेत साखरपुडा करणार आहेत, हे जवळपास निश्चित झाल्याचे कळते. काहींनी तर दीपिका- रणवीर लग्न करणार असल्याचे तर्कही लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या दीपिका आणि रणवीर त्यांच्या कुटुंबियांसोबत असून, दीपिकाच्या वाढदिवसाच्याच निमित्ताने त्यांचा साखरपुडा पार पडणार असल्याचे कळते आहे.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

बॉलिवूडमध्ये ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखले जाणारे हे ‘बाजीराव-मस्तानी’ त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला नवे नाव देतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या चर्चा पाहता दीपिका, रणवीरच्या चाहत्यांनीही त्यांच्या या ‘सिक्रेट प्लॅन’विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे. तेव्हा आता सर्वांना बॉलिवूडच्या या ‘मस्तानी’च्या वाढदिवसाचीच प्रतीक्षा आहे असं म्हणायला हरकत नाही.

Story img Loader