गायक, संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया सध्या त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे काही दिवसांपूर्वीच उघड झाले होते. सोनिया कपूर आणि हिमेशचे प्रेमसंबंध फार जुने असल्याचे म्हटले जात आहे. सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या हिमेशने आता त्यांच्या नात्याला एक वेगळी ओळख देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हिमेश आणि सोनिया पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याच्या घडीला हिमेश त्याच्या कामांमध्ये व्यग्र आहे. पण, तरीही सोनिया आणि तो लग्न करण्याचा निर्णय घेण्याची चिन्हं आहेत. कारण, त्यांना या नात्याला नवी ओळख द्यायची आहे. हिमेशच्या कुटुंबियांनाही सोनिया फारच आवडली असून, पुढील वर्षी हे दोघेही लग्न करु शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वीच हिमेशला त्याच्या आणि सोनियाच्या लग्नाविषयी विचारण्यात आले त्यावेळी त्याने याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे नाते सर्वांसमोर आले होते. तेव्हापासून हिमेश आणि सोनियाच्या भेटीगाठी वाढत गेल्या. पत्नीपासून घटस्फोट घेण्याआधीपासूनच तो सोनियासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला होता. सोनियासाठी त्याने पत्नी कोमलसोबतचे नातेही तोडले. जवळपास २२ वर्षे चाललेला संसार संपवत हिमेशने कोमलपासून विभक्त निर्णय घेतला होता. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच जणांना सोनिया आणि हिमेशच्या नात्याची कल्पना आहे. ती बऱ्याचदा त्याच्या स्टुडिओमध्ये आणि रिअॅलिटी शो च्या सेटवर जाते. सोनिया आणि कोमलच्या नात्यात लग्नाचे वळण येणार याची जोरदार चर्चा सुरु असली, तरी हिमेश याबद्दलची घोषणा नेमकी कधी करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.