मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आत्मचरित्रपट ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच चांगली बॅटिंग करायला सुरूवात केली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये मिळून ८.४० कोटींची कमाई केली आहे.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच गर्दी होती. त्यामुळे हा सिनेमा पहिल्याच दिवशी ८ ते १० कोटींपर्यंतची कमाई करणार असा अंदाज व्यापार विश्लेषकांनी लावला होता. त्यानुसार या सिनेमाने पहिल्या दिवशी ८.४० कोटी एवढी कमाई केली. त्यामुळे या वीकेण्डलाही सिनेमा चांगला गल्ला जमवण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला होता. भारतात २४०० आणि परदेशात ४०० स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY… Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]
— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2017
सिनेमाची पहिल्या दिवसाची कमाई समानाधकारक असली तरी या सिनेमाला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चरित्रपटाचा विक्रम मोडता आला नाही. ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी २१.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. शिवाय हा सिनेमा गेल्या वर्षी पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला होता.
सचिनने सांगावे आणि ते जसेच्या तसे चित्ररूपात तुमच्यासमोर उभे राहावे, ही किमया ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ सिनेमात साधली गेली आहे. सचिन, सचिनची बहीण सविता, भाऊ नितीन आणि अजित, आई-वडील, पत्नी अंजली, आचरेकर सर ही मंडळी त्या त्या काळातील फुटेजमध्ये त्यांच्या वास्तव रूपात सिनेमात पाहायला मिळतात.
हॉलीवूडच्या गायिकेकडून भारतातल्या गावाला मदत, गाव झालं ‘स्मार्ट’
दरम्यान, या सिनेमाचा सध्या सगळीकडेच बोलबाला असताना सचिनने या सिनेमाचे प्रमोशन हिंदीमधील काही कार्यक्रमांमध्ये करायला नापसंती दर्शवली होती. ‘द कपिल शर्मा शो’ या गाजलेल्या कार्यक्रमात सिनेमाचे प्रमोशन करायला सचिनने स्पष्ट नकार दिला होता. याऐवजी तो चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सिनेमाचे प्रमोशन करायला गेला होता.