क्रिकेटला राजाश्रय मिळालेल्या आपल्या देशात हॉकीसाठी एखाद्या खेळाडूची धडपड, त्याच्या वाटेत येणाऱ्या अडचणी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात असणारी देशप्रेमाची भावना या सर्व गोष्टींची घडी बसवत ‘सूरमा’ हा सिनेमा साकारण्यात आला आहे. यामध्ये पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहेत. उद्या म्हणजेच १३ जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचं स्पेशल स्क्रिनिंग नुकतंच पार पडलं. या स्क्रिनिंगला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती. सचिनला हा सिनेमा खूप आवडला असून इतरांनीही तो का पाहावा याचं कारण तो सांगत आहे.

‘सूरमाची कथा फारच प्रेरणादायी आहे. यातील कलाकारांनीही दमदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ खेळाडूंसाठीच नाही तर सामान्यांसाठीही ही कथा प्रेरणादायी आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची आणि पराभव झालाच तरी पुन्हा एकदा जोमाने लढण्यास उभं राहण्याची शिकवण हा चित्रपट देतो,’ असं तो म्हणतो.

वाचा : चित्रपटानंतर आता संजूबाबाचं आत्मचरित्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सिनेमाच्या माध्यमातून हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शाद अली दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.