मे महिना सुरु झाला की लग्नसराईला सुरुवात होते. डिसेंबर- जानेवारी महिन्यात बऱ्याच मराठी सेलिब्रिटींची लग्न झालेली पाहायला मिळाली. मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे, अक्षया गुरव, अतुला दुग्गल या अभिनेत्रींना त्यांच्या आयुष्याचे जोडीदार मिळाले. गेल्या तीन महिन्यांपासून शांत झालेले सनई चौघड्यांचे सूर आता पुन्हा घुमणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेय वाघने त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि सगळीकडेच त्याच्या नावाच्या चर्चा सुरु झाल्या. अमेयचे लग्न आता काही दिवसांवर आले असून आणखी काही मराठी सेलिब्रिटी आता विवाहबंधनात अडकणार आहेत.

अभिनेत्री सागरिका घाटगे- क्रिकेटर झहिर खान

zaheer-sagarika-759
मराठी चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट क्षेत्रात आता पुन्हा एकदा सनई-चौघड्यांचे सूर घुमणार आहेत. भारतीय गोलंदाज झहीर खान Zaheer Khan आणि अभिनेत्री सागरिका घाटगे Sagarika Ghatge यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. गेल्या काही महिन्यांपासून झहीर आणि सागरिकामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या. पण, एप्रिल महिन्यात आयपीएल सुरु होण्यापूर्वी झहीरने ट्विट करून तो सागरिकाशी लग्न करणार असल्याची माहिती दिली. बोटात साखरपुड्याची अंगठी घातलेल्या सागरिकासोबतचा फोटो शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी दिली होती. या वर्षाअखेरपर्यंत हे प्रेमीयुगुल लग्न करणार असल्याचे कळते.

अभिनेता अमेय वाघ- साजिरी देशपांडे

amey-wagh
मंगळवारी संध्याकाळी फेसबुक पोस्ट शेअर करत अमेयने त्याच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो शेअर केला. अमेयने साजिरीसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात होण्यास आता केवळ १२ दिवस राहिले असल्याचे सांगितले.

अभिनेता संग्राम साळवी – अभिनेत्री खुशबू तावडे

khushboo-sangram
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करणारी अभिनेत्री खुशबू तावडेचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. मालिकेत ‘बुलबुल’ची भूमिका साकारणाऱ्या खुशबूने ‘देवयानी’ फेम संग्राम साळवी याच्याशी साखरपुडा केलाय. आता हे लवकरच लग्न करणार असल्याचे कळते.

अभिनेता रोहन गुजर- स्नेहल देशमुख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rohan-gujar
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत जान्हवीच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहन गुजरचा काही दिवसांपूर्वीच स्नेहल देशमुख हिच्याशी साखरपुडा झाला. रोहन आणि स्नेहल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासूनच्या मैत्रिणीचीच त्याने आयुष्याभरासाठी जोडीदार म्हणून निवड केली.