क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किचच्या ‘ग्रॅण्ड वेडींग’नंतर आता आणखी एक जोडी लग्नासाठी सज्ज झालीये. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटर झहीर खान या वर्षाअखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळतेय. एप्रिल महिन्यातच दोघांचा साखरपुडा झाला. झहीरने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी शेअर केली होती. आता दोघांच्या लग्नाबद्दलची काही माहिती समोर आली आहे.

‘लग्नासाठी मी खूप उत्सुक आहे. अद्याप तारीख ठरली नसली तरी या वर्षाअखेरीस आमचं लग्न होईल एवढंच मी सांगेन,’ असे सागरिकाने सांगितले. झहीर आणि सागरिकाचं लग्न कसं होणार याची उत्सुकता अनेकांनाच आहे. मात्र अद्याप काहीच तयारी झालं नसल्याचं सागरिका म्हणते. ‘आम्ही लग्नासाठी शॉपिंगसुद्धा केलेली नाही. लग्नाचा हॉलही बुक झालेला नाही. लग्नाच्या तयारीचा विषय काढला की आता फार वेळ उरलेला नाही हेच आमच्या लक्षात येऊन ताण येतो. कमी वेळात सगळी तयारी कशी करायची याचा विचार आम्ही करत आहोत,’ असं तिने पुढे सांगितलं.

https://www.instagram.com/p/BWYrLAXj0Gi/

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरपुड्यानंतर झहीर आणि सागरिका एकमेकांना जास्त वेळ देण्याला प्राधान्य देत असल्याचं दिसून आलं. जमैका, न्यूयॉर्क, लंडनमध्ये फिरतानाचे दोघांचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची पहिल्यांदा भेट झाली आणि मैत्री जमली. या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. ‘चक दे इंडिया’, ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांमध्ये सागरिकाने भूमिका साकारली. आता लग्नानंतरही अभिनय क्षेत्रातील करिअर पुढे नेणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं. तिच्या या निर्णयाला झहीरचाही पाठिंबा असल्याचं तिने सांगितलं.