भारतीय क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल कीच, झहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे, महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी आणि शिखर धवनची पत्नी आएशा धवन यांच्यात आता घट्ट मैत्री जमल्याचे चित्र दिसत आहे. जमैकामध्ये एकीकडे भारतीय संघाचे हे क्रिकेटर सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या पत्नी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. सबिना पार्क स्टेडिअममध्ये चिअर करत असतानाच या चौघी आणखी एका कामात व्यस्त दिसत होत्या आणि हे काम म्हणजे सेल्फी काढणे. हेजल आणि सागरिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये चौघींच्या मैत्रीची झलक पाहायला मिळतेय.

गुरुवारी जेव्हा भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजविरोधात पाचवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता तेव्हा स्टेडिअममध्ये सागरिका, हेजल, साक्षी आणि आएशा खेळाचा आनंद लुटताना दिसले. ‘चक दे इंडिया’ गर्ल म्हणजेच सागरिका लवकरच क्रिकेटर झहीर खानसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवरील सागरिकाने शेअर केलेल फोटो पाहता हेजल आणि तिच्यात चांगलीच मैत्री जमल्याचे दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BWN58L5B4Ut/

वाचा : .. म्हणून कैलाश खेरने केलेला आत्महत्येचा प्रयत्न

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या सेल्फीमध्ये हेजल, सागरिका, साक्षी आणि तिची चिमुकली झिवा आणि आएशा एकमेकींच्या सहवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत. ‘माझ्या नवीन मैत्रिणींना भेटा…मी तुम्हाला कधीच सोडणार नाही’ असं कॅप्शनदेखील हेजलने या फोटोला दिले आहे. झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. या साखरपुड्याला भारतीय संघाचे अनेक आजी आणि माजी खेळाडू उपस्थित होते. विविध बॉलिवूड तारकांनीही हजेरी लावली होती. या वर्षाअखेरीस हे दोघे विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे.