भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर त्यांनी आपल्या मित्रपरिवारासाठी मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टी आणि आलिशान रिसेप्शनचे आयोजन केले होते. यानंतर हे नवदाम्पत्य गेल्याच आठवड्यात कोल्हापूरला देवीचा आशीर्वाद घेण्यासाठीही गेले. लग्नानंतरचे हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर हे दोघं आता हनीमूनला गेले आहेत.
TOP 10 NEWS : विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चर्चेपासून पुन्हा बाबा झालेल्या स्वप्निल जोशीपर्यंत..
झहीर – सागरिकाने हनीमूनसाठी जगातील रोमॅण्टिक स्थळांपैकी एक असलेल्या मालदीवची निवड केली आहे. तेथील काही फोटोही या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केले आहेत. मालदीवमधील सुंदर निसर्ग या फोटोंमध्ये पाहायला मिळतो.
या वर्षात अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले. सेलिब्रिटींमध्ये झहीर – सागरिकाचे लग्न झाल्यानंतर त्यापाठोपाठ अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ताच्या लग्नाचे वृत्त समोर आले. त्यानंतर ३ डिसेंबरला ‘लाफ्टरक्वीन’ भारती सिंग आणि अभिनेत्री आश्का गोरडिया त्यांच्या प्रियकरांसह लग्नाच्या बेडीत अडकल्या. पण, लग्नाचा मोसम अद्याप संपलेला नाही. कारण, अजून एका क्रिकेटर आणि अभिनेत्रीच्या लग्नाच्या वृत्ताने सद्या जोर धरलेला आहे. आता हे जोडपे कोण हे काही वेगळं सांगायला नको.
सॅनिटरी नॅपकिनविषयी दियाने दिला महत्त्वाचा संदेश
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इटलीमध्ये लग्न करणार असल्याचे वृत्त सध्या वाऱ्यासारखे पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या केवळ अफवा असल्याचेही समोर आले होते. मात्र, गुरुवारी रात्री अनुष्का तिच्या कुटुंबासह परदेशी जाताना दिसली आणि पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या वृत्ताने जोर धरला.