अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांनी गुरुवारी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो काही वेळातच सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. त्यानंतर या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मात्र, सागरिका आणि झहीरचे सेलिब्रेशन अद्याप काही संपत नसल्याचे दिसते. आपल्या निकटवर्तीयांसाठी आणि मित्रमंडळींसाठी पार्टीचे आयोजन केल्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

लेहंगा घातलेली सागरिका यावेळी अप्रतिम दिसत होती. तर झहीरही तिच्यापेक्षा काही कमी नव्हता. त्यानेही निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

अभिनेता आशिष चौधरी आणि अभिनेत्री विद्या मालवदेने मेहंदी कार्यक्रमामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सागरिका आणि झहीरच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन आज होणार आहे. नुकतेच, या जोडप्याने ‘हार्पर बाझार ब्राइड’साठी फोटोशूटही केले. या फोटोशूटमधील आतापर्यंत एकच फोटो समोर आला असला तरी या दोघांची केमिस्ट्री नक्कीच लक्षवेधी आहे. ‘हार्पर बाझार’ मासिकाच्या ‘जस्ट मॅरिड’ या विशेष भागात हे नवदाम्पत्य दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bb2Ix_OAnbN/

नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर झहीर-सागरिकाने कॉकटेल पार्टी ठेवली होती. या पार्टीला अनेक क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. यात सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, अजित आगरकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतून सागरिकाची ‘चक दे इंडिया’मधील सहकलाकार विद्या मालवदे, हेजल कीच यांचाही समावेश होता.