बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आणि म्हणाली की राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. त्यासोबत गहनाने मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव घेतलं आहे. आता सईने यावर उत्तर दिलं आहे.

‘महाराष्ट्र टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सईने हे सगळे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. सईला कोणत्याही प्रकारच्या अश्लील व्हिडीओ किंवा वेब सीरिजविषयी विचारणा करण्यात आली नाही. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपशी सईचा कोणता ही संबंध नाही’, असे सईच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गहनाने ‘नवभार टाईम्स ऑनलाईन’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. “तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी कळले की बॉलीफेम नावाचं एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती. त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एक-एक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला. मला अटक होण्याच्या ३ ते ४ दिवस आधी मी त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा विचार करत होते. मी हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते,” असे गहना म्हणाली.