बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याची ‘तांडव’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यातच काही दिवसांपूर्वी सैफला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. मात्र, फोटोग्राफर्सला पाहून सैफ चांगलाच संतापल्याचं दिसून आलं. त्याने थेट छायाचित्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवला.
‘तांडव’ या सीरिजवरुन सुरु झालेल्या वादामुळे सध्या सैफ अली खानच्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. याच काळातला सैफचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सैफला तैमूरसोबत त्याच्या इमारतीखाली स्पॉट करण्यात आलं. सैफ तैमूरला घेऊन त्याच्या गाडीतून उतरला आणि इमारतीमध्ये प्रवेश करत होता. याचवेळी सैफला पाहून फोटोग्राफर्सने त्याचे फोटो काढण्यास सुरुवात केली. तसंच त्याला काही प्रश्नदेखील विचारले. घडत असलेला हा प्रकार पाहून सैफ भडकला आणि त्याने थेट छायाचित्रकारांना बाहेर जाण्यास सांगितलं. तसंच त्याच्या गार्डनेदेखील छायाचित्रकारांना गेट बाहेर जाण्याचा इशारा दिला.
वाचा : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात
दरम्यान, सैफची ‘तांडव’ ही सीरिज सध्या वादामध्ये सापडली आहे. या सीरिजमध्ये भगवान श्रीराम, नारदमुनी आणि शंकर या देवांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच या सीरिज आणि निर्मात्यांविरोधात अनेक ठिकाणी तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.