मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून ‘आर्ची’ आणि ‘परशा’ची प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. याच सैराट प्रेमकथेचा आधार घेत ‘धर्मा प्रॉडक्शन्स’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ‘धडक’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. त्यासाठी या दोघांनीही तयारीही सुरु केली आहे.
‘धडक’च्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी आणि ईशान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारणाल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे नावही अनेकांचे लक्ष वेधत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरही हे नाव ज्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे ते पाहता, या चित्रपटाचा विषय ‘हॉनर किलिंग’शी संबंधित असल्याचे लक्षात येते. कारण, ‘धडक’ या नावावरही रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ही प्रेमकथा ६ जुलै २०१८ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता जान्हवी, ईशानचा ‘धडक’ बॉक्स ऑफिसवर किती यशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Presenting the two new heartbeats of the Dharma family, Janhvi & Ishaan in #धड़क. Directed by @ShashankKhaitan, the master of heartland romance and creator of the Dulhania franchise. Releases on 6th July, 2018. @karanjohar @apoorvamehta18 @ZeeStudios_ pic.twitter.com/Kj9J8BBBKg
— Dharma Productions (@DharmaMovies) November 15, 2017
EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल
ईशान आणि जान्हवी या दोघांसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे यात शंका नाही. सेलिब्रिटी कुटुंबांतून आलेल्या या दोन्ही नवोदित कलाकारांवर एक वेगळ्यात प्रकारचे दडपण, असून आता त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. जान्हवीची आई, म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीसुद्धा आपल्या मुलीच्या पदार्पणावर जास्तच लक्ष देत असल्याचे पाहायला मिळत आहे.