सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार पाडला. सिनेमाच्या फर्स्ट डे- फर्स्ट शोला सुमारे ८० टक्के चित्रपटगृहं भरलेली होती. यावरुनच सलमानचा हा सिनेमा लोकांना किती आवडतोय हे लक्षात येतं. सलमानच्या कट्टर चाहत्यांनी तर सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच तिकिटं काढली होती.

जर तुम्ही सलमानचे कट्टर चाहते आहात तर आपण सिनेमात काय चांगलं आणि काय वाईट पाहतोय याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. सलमानच्या सिनेमात शक्यतो तर्क शोधला जात नाही. जर तुम्ही तर्क शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कदाचित हा सिनेमा तेवढा आवडणार नाही. ‘ट्रेलर पॉइंट’ नावाच्या एका यूट्युब चॅनलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमा तयार करताना करण्यात आलेल्या ३५ चुका दाखवण्यात आल्या आहेत.

या सिनेमातील एका दृश्यात सलमान स्पायडर मॅनसारखा उडी मारुन खिडकीकडे पोहोचतो. पण जेव्हा सलमान जमिनीवर असतो तेव्हा त्याच्या जॅकेटची चैन उघडी असते, तर तो खिडकीकडे पोहोचला की त्याच्या जॅकेटची चैन बंद असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे एका दृश्यात कतरिना कैफला सर्वात जड बंदूक दिलेली असते. सामान्यपणे ही बंदूक चालवताना तंदूरूस्त माणूसही हलतो, पण कतरिना मात्र अगदी सहजपणे ती बंदूक चालवताना दिसत आहे. ‘टायगर जिंदा है’ या सिनेमात अशा अनेक चुका आहेत, त्यामुळे हा सिनेमा पाहताना डोकं बाजूला ठेवणेच योग्य.