बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने २४ दिवसांत ३२५ कोटींची कमाई केली. ‘सुलतान’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत ‘टायगर जिंदा है’ने दणक्यात कमाई केली. एकीकडे मोठ्या पडद्यावर सलमानची जादू कायम असतानाच छोट्या पडद्यावरही त्याचाच बोलबाला आहे. ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक म्हणून तो गेले तीन महिने छोट्या पडद्यावर झळकला. रविवारी हे पर्व संपले आणि टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे विजेती ठरली. १५ आठवड्यांच्या मानधनासोबतच तिला ४४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. ‘बिग बॉस’मुळे स्पर्धकांची चांगलीच कमाई झाली यात काही शंका नाही, पण त्यासोबतच सलमानच्या कमाईतही जबरदस्त वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिलेल्या व्रत्तानुसार, सलमानने बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रत्येक एपिसोडसाठी आठ कोटी रुपये इतके मानधन घेतले होते. तर यंदाच्या पर्वासाठी ही रक्कम वाढवून त्याने प्रत्येक एपिसोडसाठी ११ कोटी रुपये मानधन घेतले. यानुसार आठवड्यातील दोन एपिसोड्सचा विचार केल्यास दर आठवड्याला २२ कोटींची कमाई होते. म्हणजेच १५ आठवड्यांपर्यंत चाललेल्या या पर्वात भाईजान सलमानने ३३० कोटींची कमाई केली.

वाचा : ‘मुघल ए आझम’ आणि दुर्मिळ पत्ते!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस ११’ लाँच होताना सलमानला त्याच्या मानधनाविषयी विचारले असता त्याने उत्तर देण्याचे टाळले होते. तर याच प्रश्नावर सलमानसाठी मोठी किंमत मोजावी लागणे गरजेचेच आहे, असे उत्तर ‘वायकॉम 18’ चे सीईओ राज नायक म्हणाले.