बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमानशी सहसा कोणी पंगा घेत नाही. चित्रपटसृष्टीतील त्याचा दबदबा पाहता त्याच्या वक्तव्यावरून कोणीही त्याच्यावर थेट निशाणा साधत नाही. पण, याला काही अपवादही असू शकतात. किंबहुना आहेतही. चित्रपटसृष्टीत एका कलाकाराच्या वक्तव्याशी सर्वजण सहमत असतील असं नाही. याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर येत आहे. नैराश्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी सलमानला फैलावरच घेतलंय.
एका मुलाखतीत सलमानला नैराश्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘अशाही बऱ्याच व्यक्ती मी पाहिल्या आहेत, जे भावनेच्याभरात वाहत जाऊन नैराश्यग्रस्त होतात. पण ही गोष्टीसुद्धा मला परवडणारी नाही. मी दु:खी किंवा भावनिक झालो किंवा मग इतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असेन तर या गोष्टी माझ्या विरोधातच जातात.’ त्याच्या या वक्तव्याचा सर्वत्र तीव्र विरोध होत आहे. विशेष म्हणजे, यावरुन अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिचं मत व्यक्त केलं. नैराश्याचा सामना हे फक्त यशस्वी आणि प्रसिद्ध व्यक्तीच करतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. बऱ्याचदा नैराश्याची चैनीच्या गोष्टींशी तुलना केली जाते. पण, हा समज मोडित काढण्याची गरज आहे, अशा शब्दांत तिने सलमानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. याशिवाय नेटिझन्सनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
https://twitter.com/snoopiku/status/978342992682586114
वाचा : ‘भाडिप’चे कलाकार ‘हाय जॅक’ करणार हिंदी चित्रपट
तुला नैराश्य म्हणजे काय हेच माहित नाही, असं एका युजरने म्हटलं तर वक्तव्यं करण्याआधी एकदा नीट विचार कर असा सल्ला एकाने सलमानला दिला. काही नेटकऱ्यांचे ट्विट पुढीलप्रमाणे आहेत..
Ye th hai hi psycho….isko depression ka matlab bhi nahi pata hoga..
— Nubi (@Nobifatima) March 27, 2018
On one hand there are stars like Deepika who constantly open up about their depression and stars like Alia/SRK who make a film on this mental issue….
On the other hand we have Salman Khan who says that depression is a luxury and he sort of equates it to taking a vacation pic.twitter.com/NccI2a95Ga— Od (@odshek) February 24, 2018