नेहमी वादविवादात, चर्चेत राहणारा आणि तितकाच लोकांना आवडणारा ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा ११ वा सिझन येत आहे. हा सिझनदेखील सलमान खानच होस्ट करणार असल्याची माहिती कलर्स चॅनलचे सीईओ राज नायक यांनी ट्विटरवर दिली आहे. या ट्विटमध्ये नायक यांनी सलमानचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान आगामी सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करत आहे.

‘बिग बॉस १०’ मध्ये झालेल्या वादविवादानंतर सलमान ‘बिग बॉस’चे पुढील सिझन करणार नसल्याची चर्चा होती. त्याचप्रमाणे तो या शोच्या ऐवजी सोनी वाहिनीवरील ‘दस का दम’ हा कार्यक्रम होस्ट करणार अशीही जोरदार चर्चा होती. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम देत नायक यांनी सलमान खानच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आगामी सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध असून शो सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/rajcheerfull/status/871804087553019905

वाचा : ही अभिनेत्री करतेय फुकटात काम?

‘बिग बॉस ११’ मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी आणि सामान्य व्यक्ती दिसतील हे तर ऑडिशन्स झाल्यानंतरच कळू शकेल. या सिझनची रचनासुद्धा यापूर्वीसारखीच असेल. सर्वसामान्यांना या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आपला फक्त एक व्हिडिओ शूट करून अपलोड करावा लागेल. मग वाट कसली बघता तुम्हालाही जर बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर करा तुमचा व्हिडिओ अपलोड.
हे आहेत आतापर्यंतचे बिग बॉस विजेते

बिग बॉस सिझन १० विजेता : मनवीर गुर्जर
वर्ष : २०१६-१७

बिग बॉस सिझन ९ विजेता : प्रिंस नरूला
वर्ष : २०१५-१६

बिग बॉस सिझन ८ विजेता : गौतम गुलाटी
वर्ष : २०१४-१५

बिग बॉस सिझन ७ विजेता : गौहर खान
वर्ष : २०१३

बिग बॉस सिझन ६ विजेता : उर्वशी ढोलकिया
वर्ष : २०१२-१३

बिग बॉस सिझन ५ विजेता : जूही परमार
वर्ष : २०११-१२

बिग बॉस सिझन ४ विजेता : श्वेता तिवारी
वर्ष : २०१०-११

बिग बॉस सिझन ३ विजेता : विंदु दारा सिंह
वर्ष : २००९

बिग बॉस सिझन २ विजेता : आशुतोष कौशिक
वर्ष : २००८

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बॉस सिझन १ विजेता : राहुल रॉय
वर्ष : २००६-०७