बॉलीवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून सर्वात पहिले कोणाचे नाव घेतले जात असेल तर ते नाव आहे दबंग सलमान खान याचे. पत्रकार परिषदेत सलमानला न चुकता विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे, तू लग्न कधी करणार? तर सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षाअखेर सलमान लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळते.
प्रेयसी लुलिया वेंतुर हिच्यासह सलमान वर्षाअखेर लग्न करणार आहे. सलमानमध्ये हा बदल येण्यामागचे कारण काय? असा प्रश्न पडला असेल ना. तर, मुंबई मिरर या वृत्तपत्राने कोणाचेही नाव घेता एक बातमी दिली आहे. त्यात म्हटलेयं की, तरुण नसलेला ‘सिंगल’ सुपरस्टार या वर्षाअखेर लग्न करण्याची शक्यता आहे. बरीच वर्ष तो बॅचलर जीवन जगतोय. त्याची आताची प्रेयसी ही परदेशी असल्याचे कळते. त्याच्या आईची इच्छा आहे की, आपल्या मुलाने लवकरात लवकर त्याची काळजी घेईल अशी जोडीदार बघावी. या सर्व गोष्टी एकाच व्यक्तीकडे लक्ष केंद्रीत करतात तो म्हणजे सलमान खान. पण याचा अर्थ आई सलमा खानच्या आनंदासाठी सलमानने लग्न करायचे ठरवलेय असा लावायचा का? सलमानचे त्याच्या आईसाठी असलेले प्रेम बघता त्याच्या लग्नाची शक्यता नाकारताही येत नाही.
५० वर्षीय सलमान लवकरचं ‘सुलतान’ या चित्रपटाने चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
अखेर, यावर्षी सलमान बोहल्यावर चढणार?
सलमानमध्ये हा बदल येण्यामागचे कारण काय?
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 06-05-2016 at 15:33 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan is finally getting married this year end