बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सलमानने वर्षाअखेर आपल्या चाहत्यांची निराशा न होऊ देण्याचा जणू चंगच बांधला होता. काल सर्वत्र प्रदर्शित झालेल्या कतरिना आणि सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने समीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवल्याचे दिसते.
Tiger Zinda Hai Review वाचा : टायगरचा ठसा!
पाच वर्षे उलटूनही प्रेक्षकांवरची ‘टायगर’ची जादू अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. कुवैतमध्ये ‘टायगर जिंदा है’वर बंदी घालण्यात आली असली तर जगभरात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सलमानच्या या चित्रपटाचा उल्लेख ‘ब्लॉकबस्टर’ असा केला आहे. भारतात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३८ कोटी रुपयांची कमाई केल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबद्दलचे कोणतेही अधिकृत वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, चित्रपटाला ऑस्ट्रेलियामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून, तेथे १.०१ कोटी तर न्यूझीलँडमध्ये ३८.५४ लाखांची कमाई केली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ६.०८ कोटींची कमाई केली आहे.
वाचा : मुक्ता बर्वेचं नवं नाटक ‘ढाई अक्षर प्रेम के’
#TigerZindaHai embarks on a MASSIVE START in Australia and New Zealand…
AUSTRALIA: Debuts at No 7 position… Fri A$ 203,882 [₹ 1.01 cr].
NEW ZEALAND: Debuts at No 4 position… Fri NZ$ 85,797 [₹ 38.54 lakhs].@Rentrak— taran adarsh (@taran_adarsh) December 22, 2017
#TigerZindaHai takes a HUMONGOUS START in UAE-GCC… Thu $ 950,000+ [₹ 6.08 cr]… Since the film is banned in Kuwait, the loss is approx $ 200,000.
— taran adarsh (@taran_adarsh) December 22, 2017
‘एक था टायगर’ चित्रपटात अविनाश राठोड ऊर्फ मनीष झा ऊर्फ ‘टायगर’ हा भारताचा ‘रॉ’ एजंट आणि ‘झोया’ पाकिस्तान ‘आयएसआय’ची एजंट दोघेही मिशनवर असताना प्रेमात पडतात. आणि प्रेम की देश यापैकी एक निवडताना ‘प्रेमा’वर शिक्कामोर्तब होते, मात्र देश आणि काम दोन्ही सोडून आता दोघांनीही दूर ऑस्ट्रियामध्ये छोटेसे घर वसवले आहे. इथे दूर टायगरच्या मायदेशी एक बातमी येऊन थडकते. इराकमध्ये ४० परिचारिकांचे अपहरण करून त्यांना तेथील रुग्णालयात इराकमधील दहशतवादी संघटना आणि त्याचा प्रमुख अबू उस्मानने (सज्जाद देलफरोझ)ओलीस ठेवले आहे. त्यांना आठवडय़ाभरात तेथून सोडवले नाही तर अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात सगळेच बेचिराख होणार. एवढ्या कमी वेळात या परिचारिकांना सोडवण्याच्या मिशनसाठी म्हणून ‘टायगर जिंदा है’चा नारा आळवला जातो. आणि इथून पुढे टायगर आणि त्याच्या टीमचे मिशन चित्रपटभर पाहायला मिळते.
#OneWordReview…#TigerZindaHai: B-L-O-C-K-B-U-S-T-E-R.
Rating:- ⭐️⭐️⭐️⭐️½— taran adarsh (@taran_adarsh) December 22, 2017