टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा तेरावा सिझन येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यापूर्वीच या शोमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. त्यापैकीच एक नाव आहे नीलम कोठारी. ‘हम साथ साथ है’ चित्रपटात नीलमने सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार नीलमने स्वत: बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ती कॉन्ट्रॅक्ट साइन करू शकते. नीलमचा पती समीर सोनी याने ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. समीर ९० दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात होता.

आणखी वाचा : ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री करताच शिवानी सुर्वेनं महेश मांजरेकरांनाही टाकलं मागे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान, सैफ अली खान, तब्बूसोबत नीलमचंही नाव समोर आलं होतं. २०१८ मध्ये जोधपूर कोर्टाने तिची सुटका केली होती.

बिग बॉसच्या या नव्या सिझनसाठी नीलमसोबतच झरीन खान, अंकिता लोखंडे, मिमोह चक्रवर्ती, हिमांशू कोहली, सोनल चौहान यांचीही नावं चर्चेत आहेत.