सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा या महिन्याच्या २२ तारखेला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे ‘स्वॅग से स्वागत’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे अगदी थोड्यावेळात सर्वांच्या तोंडी बसले. कित्येक दिवस सोशल मीडियावर फक्त याच गाण्याचीच चर्चा होती. आता या सिनेमाचे ‘दिल दिया गल्ला’ हे दुसरे गाणे उद्या म्हणजे २ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे नवीन गाणे सलमान सुत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस ११’ या शोदरम्यान प्रदर्शित केले जाणार आहे. वैभवी मर्चंटने या सिनेमाचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे एक रोमॅण्टिक गाणे असणार आहे. नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत झोया अर्थात कतरिना कैफचे बर्फावर सुंदर पेंटिंग काढलेले दिसते. तिचे हे पेंटिंग दुसरे कोणी नाही तर खुद्द सलमान खाननेच काढलेले असते. या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, ‘टायगरने बर्फावर झोयाचे पेंटिंग काढून जणू तो क्षणच गोठवला.’
Tiger freezes a moment in time, by painting Zoya’s portrait on ice Watch it in #DilDiyanGallan TOMORROW. | @BeingSalmanKhan | #KatrinaKaif | @aliabbaszafar | @yrfmusic | @yrf | #TigerZoya pic.twitter.com/Q9i5IDawpY
— #TigerZindaHai (@TigerZindaHai) December 1, 2017
अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा ‘एक था टायगर’चा रिमेक आहे. २०१२ मध्ये आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. ‘एक था टायगर’ची कथा जिथे संपली तिथून पुढे ‘टायगर जिंदा है’ची कथा पुढे जाणार आहे. यात एकाहून एक साहसदृश्य दाखवली जाणार आहेत. भाईजान सलमान आणि कतरिना यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या सिनेमासाठी पट्टीच्या कलाकारांची मदत घेण्यात आली आहे. ‘बॅटमॅन- ग डार्क नाइट’ या सिनेमातील साहसदृश्यांचे दिग्दर्शन केलेल्या टॉम स्ट्रथर्स यांच्या मार्गदर्शनानुसार ‘टायगर…’मधील साहसदृश्ये साकारण्यात आली आहेत.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘स्टंट परफॉर्मर’ टॉम यांनी त्यांच्या टीमसह ‘टायगर जिंदा है’मधील थरार आणखी वाढवला आहे. अबु धाबीमध्ये या चित्रपटाच्या जास्तीत जास्त साहसदृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी हॅलिकॉप्टर, मोठमोठ्या कार्स, चित्रीकरणासाठी लागणारी सैन्याची वाहने आणि शस्त्रास्त्रे या साऱ्याची सोयही करण्यात आली होती. या साहसदृश्यांमध्ये कमालीचे बारकावे टीपण्यात आले असून, आता ते सिनेमासाठी कितपत फायद्याचे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.