बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान एकामागोमाग एक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. एकीकडे ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले असताना त्याच्या आगामी ‘रेस ३’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यामधील सलमानचा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होत आहे.
ट्विटरवर फोटो पोस्ट करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘…आणि रेस ३ला सुरुवात!’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा अॅक्शनपटात भूमिका साकारत आहे. ९ नोव्हेंबरपासून याच्या शूटिंगला सुरुवात झाली. रेमो डिसूझा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये सलमानसोबतच जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह, पूजा हेगडे आणि बॉबी देओल महत्त्वपूर्ण भुमिकेत पाहायला मिळणार आहेत.
…. and Race3 begins pic.twitter.com/2TqNDGjLhD
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2017
याआधी रेमोने शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये चित्रपटातील सर्व कलाकार पाहायला मिळतात. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर ‘रेस ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा ‘फन्ने खान’ हा चित्रपटदेखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर या दोघांच्या चित्रपटांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.