बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमानच्या घरी गेल्या शनिवारी एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनसाठी दोन कारणं होती. एक म्हणजे त्याची बहिण अर्पिताच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि दुसरं म्हणजे सलमानचे आई-वडील म्हणजेच सलीम आणि सलमा यांच्या लग्नाचा ५३वा वाढदिवस होता. पार्टीला खान कुटुंबियांसोबतच काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते. यावेळी सलमानने त्याच्या आईवडिलांना एक खास सरप्राइज दिलं.

सलमानचं हे सरप्राइज म्हणजे त्याने गायलेलं गाणं. ‘जब कोई बात बिगड जाए’ हे गाणं त्याने या पार्टीत गायलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO : गुलाबजाम देऊन हर्षने भारतीला केलं प्रपोज

सलमान आणि कटरिना इंडियन सुपर लीगमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोच्चीला गेले होते. तेथून थेट हे दोघे पार्टीला पोहोचले. यावेळी सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर त्याच्यासोबतच होती. याशिवाय मलायका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्झा असे बरेच कलाकार उपस्थित होते.