सुपरस्टार सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान ‘ट्युबलाइट’च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत. भारत-चीन युद्धावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू हीदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. झू झूला पूर्णत: वेगळ्या भाषेत भूमिका साकारण्याचे आव्हान लक्षात घेता तिला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सलमान स्वत: तिच्या मदतीला धावून गेला होता.

हिंदी भाषेतील संवाद शिकण्यासाठी झू झूने हिंदीचं विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतलं. नवीन भाषा शिकण्यासाठी झू झू आपल्या परिने कठोर मेहनत घेत जरी होती तरी ही भाषा संपूर्ण शिकण्यासाठी तिच्याकडे पुरेसा अवधी नव्हता. त्याचप्रमाणे परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखला जाणारा दिग्दर्शक कबीर खानला जोपर्यंत भाषा व्यवस्थित शिकून घेता येत नाही तोपर्यंत शूटदेखील तो सुरू करत नाही असे म्हटले जाते. त्यामुळेच झू झूने हिंदीचे धडे गिरवायला आपल्यापरिने आधीपासून सुरुवात केली होती.

oh-wow-salman-khan-turns-hindi-teacher-for-zhu-zhu

झू झूला लवकरात लवकर ही भाषा चांगल्याप्रकारे शिकता यावी यासाठी सलमानने तिची फार मदत केली होती. झू झूला तिच्या संवादांचे अर्थ समजावून सांगणे, ओळींना लक्षात ठेवण्यासाठी सोपे मार्ग सांगण्याचे काम सलमानने केले. सलमान आणि झू झूची ही मेहनत चित्रपटातही दिसेल यात काही शंका नाही.

वाचा : टॉप ५ मध्ये परतला कपिल शर्माचा शो

सलमान खान आणि त्याची आई सलमा यांची यंसुक्त निर्मिती असलेल्या ‘ट्युबलाइट’चं चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी, बालकलाकार माटिन रे तंगू, सोहेल खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून, शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.