बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या salman khan ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर Tubelight trailer प्रसारमाध्यमांसमोर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी सलमान खान, सोहेल खान, दिग्दर्शक कबीर खान आणि संगीतकार प्रीतम उपस्थित होते.
भाऊ कसा असावा असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तो भरत, लक्ष्मण यांच्यासारखा असावा, असंच उत्तर अनेक कुटुंबांमधून मिळतं. सलमान (लक्ष्मण) आणि सोहेल खान (भरत) Sohail Khan या दोन भावांच्या अतुट नात्याचा हाच धागा ‘ट्युबलाइट’मध्ये पाहता येणार आहे. १९६२ मध्ये झालेल्या भारत- चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक फिरते.
वाचा : ‘ट्युबलाइट’चा सिक्वल ‘एलईडी’ असेल, सलमानची मार्मिक टिप्पणी
लक्ष्मण आणि भरत दोघांनाही भारतीय सैन्यात भरती व्हायचे असते. पण निवड मात्र भरतचीच होते. त्यामुळे भरत भारतीय सैन्यात जातो आणि लक्ष्मण मात्र गावीच राहतो. या दरम्यान भारत- चीन युद्धाला सुरूवात होते आणि या युद्धात भरत बेपत्ता होतो. भरत आता कधीच दिसणार नाही, असा गावातल्यांचा समज होतो. पण आपला भाऊ जिवंत असणार यावर लक्ष्मणचा विश्वास असतो. म्हणून तो आपल्या भावाला शोधण्यासाठी निघतो. त्याच्या या प्रवासात भरत त्याला भेटतो की नाही सिनेमातली अभिनेत्री झू झू त्याला कशी भेटते हे सगळं गुपितचं ठेवलेलं आहे. सलमानकडे सुपर पावर असते की काय असा प्रश्नही ट्रेलर बघताना पडू शकतो.
वाचा : ‘ट्युबलाइट’ सिनेमातील सलमान- माटिनची मस्ती पाहिली का?
सलमानचे गेले काही सिनेमे पाहिले तर तो कौटुंबिक सिनेमे करण्यालाच अधिक प्राधान्य देतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सलमानच्या कट्टर चाहत्यांना हा ट्रेलर नक्कीच आवडेल. पण ‘ट्युबलाइट’चा हा ट्रेलर बघताना सलमानच्या अभिनयात कोणत्याही प्रकारचं नाविन्य दिसत नाही. ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात सलमानला निरागस दाखवण्यात आले होते. तोच निरागसपणा या सिनेमातही दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सलमान काही फार वेगळं करतो, असं ट्रेलर बघताना वाटत नाही.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/867621257595854848
‘क्या तुम्हे यकीन है…’ ही ट्रेलरची टॅगलाईनच आहे. जर विश्वास असेल तर अशक्य ही साध्य करता येतं या एका ओळीवर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. फक्त जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी समर्पित भावना आणि विश्वास या दोन गोष्टींची गरज असते.
ट्रेलरमध्ये अभिनेत्री झू झू या नायिकेची व्यक्तिरेखा अजिबातच दाखवली नाही. त्यामुळे सलमान- झू झू यांची प्रेम कहाणी या ट्रेलरमध्ये दिसत नाही. पण शाहरुख खानची झलक मात्र नक्की पाहायला मिळते. त्यामुळेच सलमान आणि शाहरुख या दोघांच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणीच असणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची व्यक्तिरेखा स्पष्ट दिसते. ते सलमानला स्वतःवर विश्वास ठेवण्याचं ध्यैय देताना दिसतात.
https://twitter.com/sonymusicindia/status/867751206046674944
https://twitter.com/sonymusicindia/status/867751049691504640
या सिनेमाची आणि पर्यायाने या ट्रेलरची सर्वात जमेची बाजू म्हणजे सिनेमाची कथा आणि लोकेशन. ट्रेलर बघताना लेह- लडाख आण इतर निसर्गरम्य ठिकाणं बघण्यात माणूस दंग होऊन जातो. नेहमीचे वायू प्रदूषण बघणाऱ्यांसाठी ती एक पर्वणीच आहे असं म्हणावं लागेल. प्रीतमचं संगीत असणाऱ्या या सिनेमाचे रेडिओ हे एकच गाणे आतापर्यंत प्रदर्शित करण्यात आले आहे. या सिनेमाची अजून तीन गाणी प्रदर्शित होणं बाकी आहेत. त्यामुळे ती गाणी नेमकी कशापद्धतीची असतील याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
गुरुवारी रात्री ९ वाजता ट्युबलाइटचा ट्रेलर चाहत्यांना पाहता येणार आहे. तर मग तुम्हीही बघा हा ट्रेलर आणि सांगा कसा वाटतोय हा ट्रेलर…