काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंग याने ‘सुलतान’ चित्रपटामधील गाण्यावर केलेल्या उत्स्फुर्त नृत्यावर सलमान खानने प्रतिक्रिया व्यक्त केली. तो शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होता. मला त्याला ठार मारावेसे वाटते. तो त्याठिकाणी चित्रपट बघायला गेला होता की नाचायला गेला होता, असे सलमानने हसत हसत विचारले. रणवीर सिंग हा बॉलीवूड इंडस्ट्रीत नेहमीच त्याच्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. ‘सुलतान’ चित्रपटाच्याबाबतीतही त्याने सगळ्यांना अचंबित करणारी कृती केली.
रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये ‘सुलतान’ चित्रपट पाहिला होता. यावेळी सुलतानच्या ‘बेबी को बेस पसंद है’ आणि ‘लगे ४४०’ वोल्ट गाण्यांवर थिरकण्याचा मोह रणवीरला आवरता आला नाही. त्याने चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू असतानाच गाण्यांवर बेधुंद होऊन नाचण्यास सुरूवात केली. उपस्थितांनाही रणवीरच्या नृत्याला जोरदार प्रतिसाद दिला. रणवीर सध्या पॅरिसमध्ये ‘बेफिक्रे’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याने आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून वेळ काढून पॅरिसमधील एका चित्रपटगृहात ‘सुलतान’ चित्रपट पाहिला. ‘सुलतान’च्या गाण्यावर थिरकतानाचे रणवीरचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले होते, ट्विटरवर #RanveerwatchesSultan हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये होता.

Story img Loader