दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य सतत चर्चेत असतो. नागा चैतन्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री समांथा अक्किनेनी हे अतिशय लोकप्रिय कपल आहेत. पण समांथाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अडनाव काढल्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेत समांथा आणि नागा चैतन्य घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यात आता समांथाने नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटासंबंधीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने हे ट्वीट नागा चैतन्यच्या आगामी चित्रपटावर केले आहे. समांथाने नागा चैतन्यचे ट्वीट रिट्वीट केले आहे. नागा चैतन्यने ट्वीट करत ‘लव्ह स्टोरी’ या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. त्यासोबत ‘लवकरच चित्रपटगृहात भेटू’ असे कॅप्शन त्याने या पोस्टवर दिली आहे. या चित्रपटात नागा चैतन्यसोबत साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागा चैतन्यचे हे ट्वीट रीट्विट करत समांथाने साई पल्लवीला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : सैफने मुलगा जहांगीरबद्दल केलं असं वक्तव्य की कपिल शर्माला हसू झालं अनावर

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

करोनामुळे चित्रपट प्रदर्शणाची तारीख सतत पुढे ढकलण्यात येत होती. मात्र, आता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शणाचा निर्णय घेतला आहे. ‘लव्ह स्टोरी’मध्ये देवयानी, राव रमेश, पोसानी कृष्णा मुरली, राजीव कनकला आणि ईश्वरी राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘लव्ह स्टोरी’मध्ये रेवंथ आणि मोनिकाची कहाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमिगॉस क्रिएशन्स आणि श्री वेंकटेश्वर सिनेमा यांनी केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha is all praise for naga chaitanya and sai pallavi s love story calls it a winner dcp