अभिनेत्री समीरा रेड्डी बॉलिवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. गेल्या दोन तीन वर्षापासून समीरा सोशल मीडियावररुन बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अनेक पोस्ट शेअर करत असते. समीराने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केलाय. या फोटोत समीराने पांढरे केस लक्ष वेधून घेत आहेत. हा फोटो शेअर करत समीराने तिच्या वडिलांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. समीराने वडील तिच्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत असून ती तिचे पांढरे केस का लपवच नाही असा प्रश्न त्यांनी समीराला विचारला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समीराने हा फोटो शेअर करत वडिलांना उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, ” माझ्या वडिलांनी मी पांढरे केस का लपवत नाही असा प्रश्न मला विचारला. ते माझ्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत आहेत.” वडिलांची चिंता दूर करत समीराने त्यांना उत्तर दिलंय. ती पुढे म्हणाली, ” काय फरक पडतो, यामुळे मला वयस्क किंवा कमी आकर्षक किंवा कमी सुंदर समजलं जाईल का?, मी त्यांना म्हणाले की आता या गोष्टीचा मला त्रास होत नाही जसा यापूर्वी व्हायचा. स्वतंत्र असण्याचा हा एक आनंद आहे.”

हे देखील वाचा: याआधी देखील कंगना रणौतने साकारली होती सीतेची भूमिका; ‘तो’ फोटो शेअर करत केला खुलासा

हे देखील वाचा: चिमुकल्यासोबत ऐश्वर्या रायचा २७ वर्ष जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढे तिने लिहिलं, “माझा एकही पांढरा केस दिसू नये म्हणून मी दर दोन आठवड्यांनी माझे केस कलर करायचे. आज केस रंगवायचे की नाही याचा निर्णय मी स्वत: घेते. मला माहितेय मी एकटी नाही. जेव्हा जुन्या विचारांच्या पद्धतीती मोडल्या जातात तेव्हाच बदल घडतो. आपण जसे आहोत तसेच राहू दिलं तर हे बदल घडणं शक्य आहेत. जेव्हा आपल्याला एखद्या रंगाच्या किंवा मास्कच्या मागे लपण्याची गरज भासणार नाही तेव्हाच आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक दिवस आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देतो यातूनच शांती मिळते.” असं समीरा म्हणाली. तसचं वडिलांची चिंता ती समजू शकते मात्र आता त्यांना उत्तर मिळालंय असंही ती म्हणाली.

समीरा रेड्डीने २०१४ सालामध्ये उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्नगाठ बांधली आहे. २०१५ सालामध्ये समीरा पहिल्यांदा आई झाली. समीराच्या मुलाचं नाव हंस आहेत. तर २०१९ सालामध्ये तिने नायरा या तिच्या मुलीला जन्म दिला.