अभिनेत्री सना खान नुकत्याच झालेल्या ब्रेकअपमुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. गेली तीन वर्ष ती नृत्यदिग्दर्शक मेलव्हन लुईसला डेट करत होती. मात्र त्याने तिचा विश्वासघात केला, असं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ब्रेकअपविषयी सांगताना सना म्हणाली. त्यानंतर आता तिने मेलव्हनला डिवचण्यासाठी आणखी एक इनस्टा पोस्ट केली आहे.
अवश्य वाचा – प्रेम शेअर करा पण ****** करु नका; पुणे पोलिसांकडून ‘व्हॅलेंटाइन डे’ची टीप
अवश्य पाहा – हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?
काय म्हणाली सना खान?
सनाने तिचा एक फोटो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर “जेव्हा वेटर तुमच्या बॉयफ्रेंडपेक्षा सुंदर दिसतो.”अशा आशयाचा मजकूर आहे. खरं तर हा एक प्रकारचा मीम्स आहे. या मीम्सच्या माध्यमातून तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. या फोटोखाली तिने “जेव्हा जग व्यवस्थित होतं, तेव्हा हा पॉइंट मी कसा मिस केला?” असं स्टेटस लिहिलं आहे.
अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा
अवश्य वाचा – नेहा कक्कर संतापली; लगावली सहकलाकाराच्या कानशीलात
सनाने केलेली ही पोस्ट ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही तरुणींनी तर त्यांचे अनुभव देखील सनासोबत शेअर केले आहेत.