‘बिग बॉस’ फेम सना खान हिने अलिकडेच इस्लाम धर्मासाठी अभिनयसृष्टीला रामराम ठोकला. तिने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. दरम्यान तिची ही पोस्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिची तुलना अभिनेत्री सोफिया हयातसोबत केली जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे चार वर्षांपूर्वी तिने देखील नन होण्यासाठी अभिनयसृष्टीतून निवृत्ती स्विकारली होती. मात्र वर्षभरातच तिने फिल्मी दुनियेत पुनरागमन केलं. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे तिची खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान नेटकऱ्यांची ही तुलना सोफियाला आवडलेली नाही. माझ्या आध्यात्मिकतेची अशी खिल्ली उडवू नका, असा इशारा तिने टीकाकारांना दिला आहे.

स्पॉटब्वॉयला दिलेल्या मुलाखतीत सोफियानं आपला राग व्यक्त केला. ती म्हणाली, “काही लोक माझी तुलना सना खानशी करत आहेत. परंतु ही तुलना मला बिलकूल आवडलेली नाही. ज्या लोकांना आध्यात्म म्हणजे काय माहित नाही ती मंडळी माझ्यावर टीका करतायेत. आधात्म कपड्यांशी निगडीत नसतं. तर माणसाच्या विचारांवर आधारित असतं. खरं तर पूर्ण कपड्यांऐवजी नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं. पण मुर्ख टीकाकारांना हे कळणार नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी कोणाशाही शारिरीक संबंध ठेवलेले नाहीत. मी आजही मदर सोफियाच आहे.” असे विचार मांडत अभिनेत्रीने टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोफियानं २००२ साली झी म्युझिक टीव्ही स्काय या रिअॅलिटी शोमध्ये अँकरिंग करुन छोट्या पडद्यावर पदार्ण केलं होतं. अॅब्युलेट पावर, बॉलिवूड स्टार यांसारख्या काही रिअॅलिटी शोमध्ये तिने काम केलं. एक्झिट्स या शॉटफिल्ममधून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर कॅश अँड करी, द अनफॉर्गेटेबल, अक्सर २ यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. बिग बॉस हा शोमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. सोफिया आपल्या अभिनयापेक्षा व्हायरल होणाऱ्या न्यूड फोटोशूटमुळे अधिक चर्चेत असते.