“तुम्ही बोलायचं … आणि आम्ही ऐकायचं” कुठे तरी ऐकल्यासारख वाटत आहे ना ? नकारात्मक झाक असूनही प्रेक्षकांच्या पसंतीचं हे पात्र म्हणजेच सरस्वती मालिकेमधील सर्जेराव चौधरी. हे पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेही एका नव्या रुपात. हो! सर्जेराव चौधरी परतले आहेत. संग्राम साळवीच्या लूक मध्ये बराच बदल करण्यात आला आहे. त्याच्या वेशभूषेपासून ते केशभूषेपर्यंत बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हे सर्जेराव अनेकांचीच मनं जिंकतील असे वाटत आहे.

दरम्यान, काही दिवस मालिकेपासून दूर असूनही सर्जेराव म्हणजेच संग्राम साळवीची लोकप्रियता कमी झालेली नाही. मालिकेमध्ये महत्वपूर्ण अशी भूमिका संग्राम याने निभावली असून तो परत आल्यामुळे प्रेक्षकांना देखील आनंद होणार आहे हे नक्की. सरस्वती आणि मोठे मालक म्हणजेच राघव यांचा संसार उधवस्त करण्याचा त्याचा हेतू अजूनही कायम आहे. त्याच्या कपटी आणि कारस्थानी विचारसरणीत काडी मात्रही बदल झालेला नाही. पण, याचा सरस्वती आणि राघव यांच्या नुकत्याच सुरळीत सुरु झालेल्या जीवनात काय बदल होईल? काय अघटीत घडेल? सर्जेराव आता कुठला नवीन डावपेच डोक्यातून ठेऊन आले आहेत हे तुम्हाला मालिका बघितल्यावरच कळणार आहे.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस
loksatta readers response
लोकमानस : ‘महाराष्ट्र थांबल्या’चा साक्षात्कार कधी?

unnamed

‘सरस्वती’ ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. सरस्वती पासून सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. म्हणूनच या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेमधील प्रेमळ, आपल्या पतीवर निस्वार्थीपणाने प्रेम करणारी, स्वच्छंदपणे आयुष्य जगणारी सरस्वती या मालिकेने सध्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर आहेत. तर या मालिकेचे दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहेत. सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे, आस्ताद काळे, संग्राम साळवी, माधव देवचक्के, सिध्देश्वर झडबुके, सुलेखा तळवळकर, पूजा नाईक, रसिक राज आणि सुनिल बर्वे या कलाकारांचा समावेश आहे.

Story img Loader