१७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या ‘पानिपत’च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले असून अभिनेता संजय दत्त, क्रिती सनॉन आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या हे त्रिकूट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यासाठी ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये पोहोचले आहेत.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार शोमध्ये संजय दत्तने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला आहे. दरम्यान शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने संजय दत्तला ‘संजू’ चित्रपटात दाखवल्या प्रमाणे ३०८ गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला आहे. त्यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिले आहे. मी माझ्या गर्लफ्रेंड किती झाल्या हे मोजत असतो आणि ते कायम मोजत राहणार. कारण माझा जीवन प्रवास अजून संपलेला नाही. पानिपत चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेने मी प्रभावीत झालो आहे आणि ती सहजपणे माझी ३०९वी गर्लफ्रेंड होऊ शकते असे संजय म्हणाला आहे.

पाहा फोटो : हे कलाकार उलगडणार ‘पानिपत’चा इतिहास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पानिपत’ चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूर सदाशिव राव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे तर क्रिती सनॉन पार्वती बाईंची भूमिका वठवणार आहे. तसेच संजय दत्त अहमद शाह अब्दालीची भूमिकेत दिसणार आहे.