बॉलिवूडचा दबंग खान मैत्रीही मनापासून करतो आणि वैरही मनापासूनच करतो. त्यामुळेच जर त्याने कोणाशी भांडण केलच तर तो ते सहसा विसरत नाही. पण यालाही काही अपवाद आहेतच. आता हेच बघा ना, गेल्या काही दिवसांपासून सलमान जुनं भांडण विसरुन पुन्हा एकदा दिग्दर्शक संजय लिला भन्साळीसोबत काम करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या येत्या होत्या. सलमान नुकताच भन्साळीच्या एका प्रोजेक्टशी करारबद्ध झाल्याच्या चर्चा सिनेवर्तुळा सुरू होत्या. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण आता मात्र तब्बल १० वर्षांनी भन्साळी आणि सलमान ही हीट जोडी एकत्र येणार हे जवळपास पक्क झालं आहे.

व्हेल माश्यासोबत कतरिनाने केले स्विमिंग

‘सुलतान’ने याआधीच भन्साळींसोबत काम करणार असल्याचं मान्य केलं होतं. पण भन्साळी यांनी यावर कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण आता उशीरा का असेने भन्साळी यांनीही ते सलमानसोबत काम करणार असल्याचं मान्य केलं आहे. यानिमित्ताने का होईना सलमान खान आणि संजय लिला भन्साळी ही गोड जोडी आता तब्बल १० वर्षांनी एकत्र येणार आहेत.

भन्साळी यांनी इन्स्टाग्रामवर सलमानसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. ‘आम्ही पुन्हा एकत्र येत आहोत. १० वर्षांनी रियुनिअन’, असा मेसेज त्यांनी या पोस्टमध्ये लिहिला आहे.

https://www.instagram.com/p/BVC2H_mhwL4/

प्रभासच्या ‘साहो’मध्ये अनुष्का दिसेल हॉट लूकमध्ये

सलमान खान आणि संजय लिला भन्साळी यांनी रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा पहिला सिनेमा ‘सावरिया’त एकत्र काम केलं होतं. हा त्यांचा एकत्र काम केलेला शेवटचा सिनेमा होता. सध्या भन्साळी हे ‘पद्मावती’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात भन्साळींची फेवरेट जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दिसणार आहेत. शाहिद कपूरचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याआधी दीपिका आणि रणवीरने भन्साळींच्याच ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन सिनेमात काम केले होते.