मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. नुकताच संकर्षणने सोशल मीडिया पोस्टद्वारे घरी दोन नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याची गोड बातमी दिली आहे. संकर्षणने बाबा झाल्याचे सांगत मुलांची नावे देखील सांगितली आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

२७ जून रोजी संकर्षणच्या पत्नीने जुळ्याच्या बाळांना जन्म दिला आहे. त्यांनी मुलाचे नाव सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये संकर्षण अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.

बाळासोबतचा फोटो शेअर करत त्याने, ‘चि. सर्वज्ञ (SARVADNYA) संकर्षण कऱ्हाडे, कु. स्रग्वी (SRAGVI) संकर्षण कऱ्हाडे (सर्वज्ञ : सर्व जाणनारा , ज्ञानी .. ; स्रग्वी : पवित्रं तुळस..)’ असे कॅप्शन दिले आहे. संकर्षणच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसचे चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

संकर्षणने आजवर मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये त्याने काम केले. नंतर त्याने ‘रामराम महाराष्ट्र’ या शोचे सूत्रसंचालनही केले आहे.