काही दिवसांपूर्वीच ट्विटरवर #SaraPlzComeOnSocialMedia हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत होता. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर पदार्पण करावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती आणि त्यासाठीच तिला गळ घालण्यात येत होती. चाहत्यांची ही विनंती ऐकत साराने अखेर आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं आहे. खरंतर सारा तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर आगमन करेल असं म्हटलं जात होतं. तर देशाच्या वाढदिवसापेक्षा दुसरा कोणताच दिवस महत्त्वाचा नाही असं म्हणत तिने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं.
साराने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केल्याच्या तासाभरातच तिचे जवळपास एक लाख फॉलोअर्स झाले. यावरूनच तिचा चाहतावर्ग किती मोठा आहे हे लक्षात येत आहे. इन्स्टाग्रामवर साराने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविंद्रनाथ टागोर यांच्या फोटोसह ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत पोस्ट केलं.
आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बी- टाऊनच्या सेलिब्रिटींकडे सोशल नेटवर्कींग साइट्स हे एक उत्तम माध्यम असतं. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साइट्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींची छोट्यातील छोटी गोष्ट त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोतच असते.
Independence Day 2018: ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, सेलिब्रिटींचा स्वातंत्र्यदिन
सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला रोहित शेट्टीचा दुसरा बिग बजेट चित्रपटसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे चाहते साराच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहे.