बॉलिवूड अभिनेत्री नेहमी ग्लॅमरस आणि सुंदर अंदाजात पाहायला मिळतात. मग तो त्यांचा एअरपोर्ट लूक असो किंवा एखादा पुरस्कार सोहळा असो अभिनेत्री नेहमीच छान आणि त्यांच्या शरीराला शोभून दिसतील असे सुंदर कपडे परिधान करताना दिसतात. याच अभिनेत्रींचे हे कपडे लाखो रुपयांचे असतात हे देखील तुम्हाला माहित आहे का? नुकताचा अभिनेत्री सारा अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये साराने परिधान केलेल्या जिन्सची सर्वत्र चर्चा आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये साराने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट. त्यावर रिप जीन्स (ripped jeans) परिधान केली असून पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते. या लूकमध्ये सारा अत्यंत ग्लॅमर आणि सुंदर अंदाजात दिसत होती. पण साराच्या लूकपेक्षा तिच्या जीन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या जीन्सची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. साराच्या या जीन्सची किंमत तब्बल दोन लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Woah #saraalikhan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाने साराला एक वेगळीच ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यानंतर आता सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सारा तिच्या पुढच्या चित्रपटाकडे वळली आहे. सारा लवकरच अभिनेता वरुण धवनच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.