अभिनेता सैफ अली खान आज त्याचा ५१ वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ करीना आणि आपल्या दोन्ही मुलांसह मालदीवला रवाना झाला आहेत. सैफच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या अनेक चाहत्यांनी तसचं सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सैफ अली खानला त्याच्या लाडक्या लेकीने म्हणजेच सारा अली खानने खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने दोन फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. मात्र साराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीनाच्या धाकट्या लेकाने म्हणजेच जेहने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. साराने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत सारा सैफ, करीना आणि चिमुकल्या जेहसोबत दिसेतय. यात करीनाने जेहला उचलून घेतलंय तर सारा क्यूट जेहकडे पाहत हसताना दिसतेय. जेहदेखील साराकडे पाहत आहे. साराच्या या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय. या फोटोत सैफ आणि करीनाचा धाकटा मुलगा खूपच क्यूट दिसतोय.
हे देखील वाचा: चार वर्षात तीन मुलं; बाळाला स्तनपान करतानाचं अभिनेत्रीचं फोटोशूट चर्चेत
View this post on Instagram
सारा अली खानने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत साराने एक पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणाली, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अब्बा…माझा सुपरहिरो असल्याबद्दल धन्यवाद, माझा स्मार्ट फ्रेण्ड, उत्तम संभाषणकार, प्रवासातील कूलेस्ट सोबती आणि मला मोठा पाठिंबा देणारा, लव्ह यू” असं म्हणत साराने वडिलांना म्हणजेच सैफ अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
साराने नुकतीच तिच्या बर्थडेला म्हणजेच १२ ऑगस्टला सैफ अली खानची भेट घेतली होती. यावेळीचे फोटो साराने शेअर केले आहेत.