बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

साराने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या मित्र-मैत्रीणीसोबत कुठे ना कुठे फिरायला जाणाऱ्या सारा यावेळी अभिनेत्री राधिका मदानसोबत लडाखला गेली आहे. काही फोटोंमध्ये सारा मंदिरात असल्याचे दिसते आहे. एवढंच नाही तर तिने नदी किनाऱ्याजवळील फोटो देखील शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ‘निसर्ग सुख शांती’, अशा आशयाचे कॅप्शन साराने दिले आहे.

आणखी वाचा : ‘लाज वाटली पाहिजे’, राम गोपाल वर्मा यांना व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

आणखी वाचा : KBC 13 ला मिळाली पहिली करोडपती, दृष्टीहीन हिमानी बुंदेलने रचला इतिहास

दरम्यान, साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपासून सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.